Hijab Controversy : निदर्शकांचा प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान हिला पाच लाख रुपयांचं बक्षीस
Continues below advertisement
कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचं लोण सगळीकडे पसरत आहे. कर्नाटकात हिजाबविरोधात निदर्शनं करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या विद्यार्थिनीला जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेनं पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. मंड्या इथल्या पीईएस महाविद्यालयातील या विद्यार्थिनीनं हिजाब परिधान केल्यानं निदर्शकांनी घोषणा देत तिला घेरलं. निदर्शकांना तिनं घोषणा देत प्रत्युत्तरही दिलं. मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर तिचं कौतुकही झालं. त्यानंतर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी तिला पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केलीय. सोलापूर जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी ही माहिती दिलीय.
Continues below advertisement
Tags :
Hijab Controversy Karnataka Hijab News Hijab News Hijab Karnataka Hijab Meaning What Is Hijab Karnataka Hijab Row High Court Hijab Issue In Karnataka What Is Hijab Controversy Hijab Is Our Right