Karnatak Hijab: कर्नाटकातील हिजाब वाद प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Continues below advertisement

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याच्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने सांगितलं. याचबरोबर याचिका दाखल करणाऱ्यांना सल्ला देत सुनावलंय आहे. हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणावर पसरवू नका, असा सल्ला न्यायालयाने दिलाय. याचिकाकर्त्यांनी हा राष्ट्रीय मुद्दा बनवू नये असंही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावलंय. याचिकाकर्त्यांनी या मुद्द्यावर हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. आता प्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram