कोरोनाचा कापा व्हेरियंट आणि केरळमधील झिका व्हायरसमुळे चिंता वाढली, दुसऱ्या लाटेचा धोकाही कायम

Continues below advertisement

मुंबई : गुरुवारी केरळमध्ये एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा झिका व्हायरसचा शिकराव झाला असल्याचं स्पष्ट झालं. संबंधित महिला ही ताप, सर्दी आणि शरीरावर पट्टे उठत असल्याने रुग्णालयात भरती झाली. तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचे ब्लड सॅम्पल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या त्या महिलेने एका बालकाला जन्म दिला असून त्या दोघांचीही प्रकृत्ती उत्तम आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram