Kanpur: इलेक्ट्रिक बसची 17 वाहनांना धडक, अपघातानंतर बसचालक फरार ABP Majha
Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये इलेक्ट्रिक बसचा मोठा अपघात झाला आहे. रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. ((पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेनं चालवण्यास सुरुवात केली. ))यावेळी समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनांना जोरदार धडक देत ही बस पुढे जात होती. इलेक्ट्रिक बसने 17 वाहनांना धडक दिलीय. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 7 जणांना ताटमिल इथल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये तर चार जणांना हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Continues below advertisement