Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Continues below advertisement
मध्य प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना मोठी माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram