DY Chandrachud : धनंजय चंद्रचूड यांनी घेतली देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

Continues below advertisement

मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेत आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ देतील. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहतील. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते.  न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल ७ वर्षे ४ महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले. वडिलांनंतर या सर्वोच्च पदावर पोहोचलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज शपथ घेतायत. पुण्यातलं कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram