Jharkhand Political Crisis :झारखंडमध्ये सत्ताधारी आमदारांना केलं एअरलिफ्ट, दोन दिवस रिसॉर्टमध्ये सोय

Continues below advertisement

झारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर यूपीएच्या आमदारांना एअरलिफ्ट करण्यात आलेय. काँग्रेस-जेएमएम आणि आरजेडीच्या 32 आमदारांना रांचीहून रायपूरला नेण्यात आले. सीएम हाऊसपासून सर्वजण रांची विमानतळावर पोहोचलेे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वतः आमदारांसह बसमध्ये होते. येथून सर्वजण इंडिगोच्या विमानाने रायपूरला रवाना झाले. तेथे दोन दिवस एका रिसॉर्टमध्ये हे सर्व राहाणार आहेत. आमदारांना रायपूरला पाठवल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानी रवाना झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर रांची विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram