राणी लक्ष्मीबाईंच्या लष्कराचं नेतृत्त्व करणाऱ्या झलकारीबाई! राणी लक्ष्मीबाईचा वेश धारण करत दिला होता लढा
Continues below advertisement
मध्यप्रदेशच्या झलकारीबाई यांची आज जयंती असून देशभरात ती साजरी केली जाते. 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धादरम्यान त्या धैर्याने लढल्या होत्या. 1858 ब्रिटिश सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला केला.
तेव्हा झलकारीबाईंनी राणी लक्ष्मीबाईचा वेश धारण केला आणि राणीला आपल्या मुलासह राजवाड्यातून बाहेर पडण्याची सूचना केली. त्या सैनिक आणि राणी लक्ष्मीबाईंच्या विश्वासू सल्लागारांपैकी एक होत्या. आजही त्यांची आठवण लोकांच्या मनात जिवंत आहे आणि त्यांचे धाडसी पराक्रम लोककथांमध्ये पुन्हा उभे राहतात.
Continues below advertisement