ABP News

JEE Mains फेब्रुवारी सेशन परीक्षेचा निकाल जाहीर, देशात 6 विद्यार्थ्यांना 100% गुण!

Continues below advertisement

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ही परिक्षा घेतली गेली. यासोबतच JEE Main 2021 परीक्षेचा फेब्रुवारी सेशनचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तीन भाषांमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा यावर्षी तेरा भाषांमध्ये घेण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram