Coronavirus | Janta Curfew | 22 मार्चला 3500 हून अधिक लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत रेल्वे गाड्या रद्द
Continues below advertisement
कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी 22 मार्चला देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दिवशी देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यात लोकल, पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. सोबतच यावेळेत लोकल आणि ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश आहे. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
Continues below advertisement