Jammu And Kashmirमध्ये रेकॉर्डब्रेक हिवाळा, थंडीने गेल्या पाच वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले | ABP Majha

Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये रेकॉर्डब्रेक हिवाळा पाहायला मिळतोय. थंडीने गेल्या पाच वर्षातला रेकॉर्ड मोडलाय. येत्या काही दिवसांतही इथल्या नागरिकांना थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत तापमानाचा किमान पारा चार अंशांवर घसरण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान १५ अंश राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडीसह दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ट्रेनचं वेळापत्रक बिघडलंय. थंडी आणि बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूकही प्रभावित झालीय. कटरामध्ये किमान तापमान ५.७ अंश इतकं नोंदवण्यात आलंय. थंडी असली तरी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram