Jaipur Chetan Singh:चेतन सिंहला11ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी,तांत्रिक पुरावे मिळाल्याची सुत्रांची माहिती
: जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणात आरोपी चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जबाब आणि तांत्रिक पुरावे यांची सांगड घालताना रेल्वे पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
मात्र, चेतन प्रश्नांना योग्य उतरे देत नसल्याने त्याला बोलते करण्यासह १० मुद्द्यांची उकल करण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांपुढे आहे. चेतनला जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये नेऊन घटनेचे नाट्यरूपांतर करण्यात आले. त्यातून तांत्रिक पुरावे मिळाल्याचे रेल्वे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.