Ravishankar Prasad : माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपलं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे. "अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन" असल्याच्या कथित कारणावरून सुमारे एक तास अकाऊंट बंद करण्यात आले होते. रविशंकर प्रसाद यांनी स्वदेशी कू अॅपवर याबाबत निवेदन काढून या कारवाईचा निषेध केला आहे.