ISRO Chandrayaan 3 : देशासाठी ऐतिहासिक क्षण, चांद्रयान-3 श्रीहरीकोटावरून झेपावणार
Continues below advertisement
ISRO Chandrayaan-3 : भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. आज चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी 2.35 वाजता करण्यात येणार आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोसाठी (ISRO) महत्त्वाचा दिवस आहे. चार वर्षानंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM-3) रॉकेटद्वारे चांद्रयान-3 प्रक्षेपित केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. ही चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरेल.
Continues below advertisement