Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
IRCTC : आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाईट बंद, तांत्रिक बिघाडामुळे तिकीट बुकिंग बंद
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIRCTC Service Down : आयआरसीटीसीच्या (IRCTC) अॅप आणि वेबसाईटवरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. आज मंगळवारी (25 जुलै) पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरु झाला आहे. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून (UTS App) तिकीट काढता येत नाही तसेच ATVM मशीन द्वारे देखील तिकीट बुकिंग होत नाही.