coronavirus death | देशात कोरोनाचा पहिला बळी; कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
देशात कोरोनानं पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीत सौदी अरेबियातून आलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्यानं ही माहिती दिली आहे. इकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालीए. कारण मुंबई, पुणे आणि ठाण्यात काल कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळेच आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली आहे. त्यात पुण्यात 9, मुंबईत 3, ठाण्यात 1, तर नागपुरात 1 रूग्ण कोरोनाग्रस्त आहेत. तर देशातील कोरोना ग्रस्तांचाआकडा आता 76 वर पोहचला आहे. ज्यात 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
मराठी बातम्या Coronavirus Death Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News