Railway : भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस, ट्रेनचे अपघात रोखण्यासाठी कवच प्रणालीची

Continues below advertisement

भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. रेल्वेने आज अनोखी चाचणी केली. स्वदेशी ट्रेन टक्कर सुरक्षा प्रणाली कवचची आज सिकंदराबादमध्ये चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे धावल्या. या चाचणी दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः एका रेल्वेत उपस्थित होते. रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. कवच तंत्रज्ञानामुळे दोन रेल्वेची धडक होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित केलंय. जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली म्हणून 'कवच' ची जाहिरात रेल्वेकडून केली जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram