Tejas Fighter Jet : भारत सरकार 97 तेजस लढाऊ विमानं आणि 156 प्रचंड अटॅक हेलिकाॅप्टर्सची खरेदी करणार
Tejas Fighter Jet : भारत सरकार 97 तेजस लढाऊ विमानं आणि 156 प्रचंड अटॅक हेलिकाॅप्टर्सची खरेदी करणार भारतीय संरक्षण निर्मिती क्षेत्रासाठी अतिशय मोठी बातमी आहे. भारत सरकार ९७ तेजस लढाऊ विमानं आणि १५६ प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर्स विकत घेणार आहे.
यासाठी जवळरपास १ लाख १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या संरक्षण खरेदी समितीनं या कराराला मान्यता दिली आहे. तेजस आणि प्रचंड या दोन्ही संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीत Hindustan Aeronautics Limited अर्थात HALची महत्त्वाची भूमिका असणार आहे, तसंच संरक्षण निर्मिती क्षेत्रात असलेल्या अन्य भारतीय कंपन्यांसाठी देखील ही मोठा संधी असणार आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत असा हा करार आहे, मात्र ही सर्व विमानं हेलिकॉप्टर्स वायुदल, लष्कर आणि नोदलाला कधी हस्तांतरित करण्य़ात येतात ते पाहावं लागेल.