Indian Army Full PC | 26 वेळा हवाई घुसखोरी, नागरी विमानांची ढाल, पाकिस्तानची लबाडी पुन्हा उघड

Continues below advertisement

Indian Army Full PC | 26 वेळा हवाई घुसखोरी, नागरी विमानांचीढाल, पाकिस्तानची लबाडी पुन्हा उघड  
 MEA Press Conference: पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबमधील हवाई तळांवर हल्ले केले. भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष्य केलं. पाकच्याही लष्करी तळांवरच आम्हीही हल्ले चढवले. सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्ध्वस्त केलं आहे. लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून पाकनं हल्ले केलेत, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. तसेच पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य करुनही भारतानं संयम राखलाय, असंही सोफिया कुरेशी (Sofia qureshi) यांनी सांगितले.   पाकिस्ताननं अनेक फेक न्यूज पसरवल्यात. भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल सुरु आहे. पाकचे दावे भारत फेटाळून लावतंय. पाककडून सीमाभागात लष्करी तैनात वाढतेय. भारतानं पाकिस्तानला आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय युद्धप्रणाली पाकिस्तानच्या युद्धप्रणाली उद्ध्वस्त करताय, अशी माहती सोफिया कुरेश यांनी दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत विविध माहिती दिली.   पाकिस्तानने 26 ठिकाणी हवाई घुसखोरीचा केला प्रयत्न- कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले की, पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने भारताच्या लष्करी तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने जवळपास सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर , भटिंडा येथे लष्करी तळावर काहीप्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola