Indian Army New Tata Vehicle : भारतीय लष्कराच्या ताफ्यात आधुनिक Bomb Proof चिलखती गाड्या सामील

Continues below advertisement

भारतीय सैन्याला आता अत्यंत आधुनिक अशा चिलखती गाड्या मिळाल्यात. या गाड्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही सेफ आहेत. पुलवामासारखे हल्ल्ल्यांना या आधुनिक चिलखती गाड्यांमुळे चाप बसणार आहे. विशेष म्हणजे या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असून याची निर्मिती टाटा एडव्हान्स सिस्टम लिमिटेडने केली आहे. या गाडीचे नाव क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम  असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. या चिलखती वाहनाला असॉल्ट रायफलच्या गोळ्याच काय बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत, या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली असून सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram