Jammu Kashmir : जम्मू काश्मीरातील पूंछमध्ये दहशतवाद्यांविरोधातील चकमक सलग आठव्या दिवशी ही सुरूच
जम्मू काश्मीरातील पूंछमध्ये आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दहशतवाद्यांविरोधातील चकमक सुरू आहे. आज या चकमकीचा आठवा दिवस आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना आतापर्यंत ९ भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. भिंबर गलीतील जंगलात लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्याचं मोठं आव्हान भारतीय जवानांसमोर आहे. त्यासाठी भारतीय जवानांकडून आता सॅनिटायझेशन ऑपरेशन म्हणजेच जी संशयास्पद वस्तू दिसेल, त्याला नष्ट करण्याची मोहीम सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याकडून या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करातील सूत्रांकडून मिळत आहे.