Indo-China Border : चीन सीमेवर आजपासून भारतीय वायुदल करणार युद्ध सराव, राफेलचा देखली असणार समावेश
तवांगमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये वाद झाल्यानंतर आजपासून चीन सीमेवर भारतीय वायुदल युद्ध सराव करतंय. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या एअर स्पेसमध्ये हा थरारक युद्ध सराव केला जातोय. या युद्ध सरावात राफेल, सुखोई या लढाऊ विमानांसोबतच हेलिकॉप्टरचाही समावेश केलाय. दरम्यान, 9 डिसेंबरला चिनी सैनिकांसोबत झालेल्या वादाच्या आधीच हा युद्ध सराव नियोजित केल्याची माहिती भारतीय वायुदलाने दिलीय.