Rashtrakul Championship : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आज दोन सुवर्णपदकं ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची विजयी घौडदौड सुरुच आहे. नवव्या दिवशी भारताच्या ३ कुस्तीपटूंनी सुवर्णपदकावर नाव कोरलंय. कुस्तीपटू रवी दहियाने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर ५३ किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगाटने सुवर्णपदक पटकावलं आहे. १९ वर्षीय नवीन मलिकने पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या कुस्तीपटूला लोळवत सुवर्णपदक पटकावलंय... यासोबतच पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलचीही सुवर्ण कामगिरी केलीये. भाविनाने महिला एकेरीत नायजेरियाच्या टेबल टेनिसपटून 3 -५ च्या फरकाने हरवलं. तसंच भारतीय महिला क्रिकेट संघाने इग्लंडला पराभूत करत अंतिम सान्यात धडक मारलीय. त्यामुळे भारताचं आणखी एक पदक पक्कं झालंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram