Semiconductor च्या बाबतीत भारत होणार आत्मनिर्भर, 76 हजार कोटींच्या PLI Scheme ला मंजुरी
आता भारतातच सेमिकंडक्टरच्या निर्मीतीसाठी ७६ हजार कोटींच्या पीएलआय स्कीमला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारत सेमिकंडक्टरच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची शक्यता आहे. भारताला आता सेमिकंडक्टरचा मॅनुफॅक्चरींग हब बनवण्याची सरकारची योजना आहे. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी सेमिकंडक्टरची गरज पडते. पण सध्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनावरबही परिणाम होतोय.