Mumbai School : मुंबईत पहिलीपासूनच्या शाळा सुरू,दोन वर्षानंतर शाळांमध्ये किलबिलाट ABP MAJHA
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इटुकल्या पिटुकल्यांची शाळा अखेर आज सुरू झालेय. मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिलपासूनच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. काल शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम होता मात्र पालिचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा सुरू होणारच असे आदेश दिल्यानं आज शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहायला मिळाला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. कुठे रांगोळ्या होत्या. कुठे फुलं दिली जात होती. विद्यार्थीही या स्वागतामुळे आणि दोन वर्षांनी शाळेत आल्यामुळे अगदी खूश दिसत होते.
Tags :
Maharashtra Mumbai मुंबई महाराष्ट्र स्वागत School Started मुंबई महाराष्ट्र Welcome शाळा सुरू स्वागत