Sri Lanka: कंगाल झालेल्या श्रीलंकेला भारताकडून 40 हजार टन डिझेलचा पुरवठा ABP Majha

Continues below advertisement

भारताच्या शेजारच्या श्रीलंकेत आर्थिक संकटानं देश पुरता कंगाल झालाय. एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे, लोक इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे आणि देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. त्यातच सत्ताधारी पक्षावर नाराज होऊन खासदारांनी पाठिंबा काढल्यानं सत्ताधारी राजपक्षे बंधूंचं आसनही डळमळीत झालं आहे. संतप्त नागरिकांनी काल राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानासमोरच निदर्शनं केली.... जनतेच्या दबावामुळे श्रीलंकेत लावण्यात आलेली आणीबाणी काल राष्ट्रपतींनी हटवली. पण देशभरात असंतोष आणि अस्थिरता कायम आहे. श्रीलंका इतकी कंगाल झालीय की तिथं अर्थमंत्रिपद सांभाळायलाही कुणी तयार नसल्याचं चित्रं समोर आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram