Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : ऐतिहासिक गगनभरारी,शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले Special Report
भारताचे शुभांशु शुक्ला यांनी अमेरिकन कंपनी अॅक्सियम स्पेसच्या अॅक्सियम फोर मिशन अंतर्गत अवकाशात झेप घेतली. १९८४ नंतर अवकाशात झेप घेणारे शुभांशु हे राकेश शर्मा यांच्यानंतर भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले. २५ जून २०२५ रोजी शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचला. शुभांशु शुक्ला भारतीय हवाई दलाचे अनुभवी पायलट आहेत. अॅक्सियम फोर मोहिमेत चार अंतराळवीर १४ दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य करणार आहेत. शुभांशु यांनी देशवासियांना संदेश देत म्हटले, 'यह भारत की ह्युमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है।'