India T 20 : भारताच्या पंधरासदस्यीय टी 20 संघाची घोषणा, विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर
ऑस्ट्रेलियातल्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल यांनी भारताच्या पंधरासदस्यीय संघात पुनरागमन केलं आहे. डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. जाडेजाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळं त्याला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. रवींद्र जाडेजाऐवजी डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलला पुन्हा संधी देण्यात आली आहे. युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात खेळलेल्या आवेश खान आणि रवी बिष्णोईला या संघांत संधी मिळालेली नाही. आपण पाहूयात कसा आहे भारताचा संघ?
Tags :
Jasprit Bumrah Ravi Bishnoi Australia Harshal Patel Twenty20 UAE Twenty20 World Cup Return To The Team Left-arm All-rounder Ravindra Jadeja Included In The World Cup Squad Due To Surgery