India Lockdown | लॉकडाऊन संपल्यानंतरचं रेल्वेचं नियोजन ठरलं, अशा सुरु होणार ट्रेन
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने लॉकडाऊननंतर रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हा सवाल अनेकांना पडला आहे. देशात पंतप्रधानांनी घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपल्यानंतर नियोजन करण्यासाठी नुकतीच रेल्वे प्रशासनाची एक व्हिडीओ कॉन्फरन्स पार पडल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या कॉन्फरन्समध्ये सीआरबीने असे संकेत दिले आहेत की सरकार कोरोना प्रकरणांच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन करण्याचा विचार करीत आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कोणतीही परिवहन सेवा सुरू केली जाणार नाही, पिवळ्या झोन मधल्या भागातल्या सेवा प्रतिबंधित असतील आणि ग्रीन भागांमध्ये सेवांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.
Continues below advertisement