Corona Recovery Rate | भारतातील कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाण 32.63 टक्क्यांवर
देशात जीवघेणा कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या व्हायरचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 78 हजार पार पोहोचली आहे. आतापर्यंत 78 हजार 03 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 2549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 26235 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मागील 24 तांसांमध्ये 3722 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे.