Hingoli no crowd for liquor | हिंगोलीत मद्य विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अटीमुळे मद्यप्रेमीची पाठ?

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आजपासून दोन दिवस जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. दारूची दुकाने उघडणार असल्यानेदुकाना समोर लाकडी  बांबूने बॅरिकेटिंग करून पांढऱ्या रंगाचे गोलाकार ही  तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर आज सकाळपासून गर्दी होईल या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हिंगोलीत मद्यपिणे दारूच्या दुकानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र. बघायला मिळाले आहे. 50 दिवसांचा कालावधी उलटल्याने अनेकांनी दारू सोडली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचबरोबर ज्यांच्याकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आहे. असेच मद्यपी दारू खरेदीसाठी येत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दारूविक्री सुरू होताच. नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या मात्र हिंगोली याला अपवाद ठरलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola