माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 4 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्ससह एकूण 22 यूट्यूब चॅनेल बंद

Continues below advertisement

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 4 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्ससह एकूण 22 यूट्यूब चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हे चॅनेल्स राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मंत्रालयाने 3 ट्विटर अकाउंट्स, 1 ​​फेसबुक पेज आणि एका वेबसाइटवर बंदी घालण्याचाही निर्णय घेतलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. बंदी घातलेले यूट्यूब चॅनेल काही न्यूज चॅनेल्सचे टेम्पलेट्स आणि लोगोही वापरत होते. तर काही प्रकरणांमध्ये पाकिस्तानमधून जाणीवपूर्वक भारतविरोधी खोट्या बातम्या दिल्या जात होत्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram