
Independence day 2023 Pm Modi : 2047 मध्ये संपूर्ण भारतदेश विकसित असेल, परिवारवाद उखडून लावणार
Independence day 2023 Pm Modi : 2047 मध्ये संपूर्ण भारतदेश विकसित असेल, परिवारवाद उखडून लावणार स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी कायम चर्चेत असते ते म्हणजे भाषणाची वेळ... 2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहे. पण चर्चा झाली ती कायम त्यांनी केलेल्या भाषणच्या वेळेची.. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर 1 तास 28 मिनिटे सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात 13 तास 40 मिनिटे भाषण केले आहे. त्यामुळे त्यांनी भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले 94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण होतं. आजवरचं सर्वात छोटं भाषण मनमोहन सिंह यांचं 2012 मध्ये 32 मिनिटांचं होतं. देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधत नवे विक्रम केले आहेत. 2015 साली पतंप्रधान मोदी यांनी 86 मिनिटे भाषण करत जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड तोडला होता. तर 2016 साली 94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण हा नवा विक्रम केला होता. तर 2017 साली पंतप्रधानांनी आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण म्हणजे 56 मिनिटांचे भाषण दिले होते.