उत्तर प्रदेशमध्ये दोन दहशतवाद्यांना बेड्या, भाजपचे मोठे नेते टार्गेटवर असल्याची सूत्रांची माहिती

Continues below advertisement

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दोन दहशतवाद्यांच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. घटनास्थळी एटीएसकडून शोध मोहीम सुरू आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पोलिसही या कारवाईत सामील झाले आहेत. जवळपासची घरे रिकामी केली गेली आहेत. बॉम्ब पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, लखनऊमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram