Yogi Adityanath | हैदराबादला भाग्यनगर बनवयाला आलोय : योगी आदित्यनाथ

Continues below advertisement
 ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं. इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांनी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?" असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram