PM Modi | पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, सीरम मधील संपूर्ण वृत्तांत

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये जातील. तिथे सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या लस निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ठिकाणी लस बनवली जाते आहे त्या प्लांटला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सीरम इन्स्टिट्यूट भेटीचा कार्यक्रम एक तासाचा असणाार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram