Jammu Kashmir : गृहमंत्री अमित शाहा तीन दिवसीय काश्मीर दौऱ्यावर, कसा असणार आहे हा दौरा?
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेटेड किलिंगचे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिनाभरातच जवळपास दहा सामान्य नागरिक अशा हल्ल्यांना बळी पडले आहेत. काश्मीरमध्ये 1990 सारखी परिस्थिती निर्माण होतेय का अशीही चर्चा त्यामुळे सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाहा काश्मीरमध्ये दाखल झालेत. श्रीनगर एअरपोर्टवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमित शाहांचं स्वागत केलं आहे.