Lakhimpur Kheri Case: लखीमपूर प्रकरणातील गृहराज्यमंत्री अजय मिश्राचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर

लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी अटकेत असलेला गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला जामीन मंजूर झाला आहे. लखानौ हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  न्या. राजीव सिंह यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 18 जानेवारी रोजी हायकोर्टात सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यावर आज निकाल दिला.  आशिष मिश्रावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया गावात मागील वर्षी तीन ऑक्टोबर रोजी आंदोलक शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. हे शेतकरी तीन कृषी कायद्यांचा विरोध करत होते. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola