Himachal Pradesh Snowfall : शिमल्यामध्ये वर्षातील पहिली बर्फवृष्टी,जनजीवन विस्कळीत ABP Majha
Himachal Pradesh Snowfall : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटक आणि स्थानिक हंगामातील पहिल्या वर्षवृष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी सकाळी जाखू टेकडीवर बर्फवृष्टी झाली. रिज मैदान आणि मॉल रोडवरही हलकी बर्फवृष्टी झाली. बर्फाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रिज मैदानावर पोहोचले. मात्र, हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला होता.
कुफरी, नारकंडासह शिमल्याच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली. दरम्यान, शिमला शहरात बर्फवृष्टीची लोक आतुरतेने वाट पाहत होते, ती शनिवारी पूर्ण झाली. दुसरीकडे, शिमलाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांनी गजबजून गेले होते. येथे मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले. पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना पाहायवा मिळाले. बर्फवृष्टीनंतर पर्यटकांचा ओघ वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली.