Cyclone Tauktae : ताऊते चक्रीवादळामुळे लक्षद्वीप परिसरात मुसळधार पाऊस सुरु, कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी
ताऊते चक्रीवादळामुळे लक्षद्वीप परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मे च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Tags :
Kokan Cyclone Tauktae Weather Forecast In Kerala Cyclone In Kerala Cyclone Tauktae News Tauktae Cyclone