Andhra Pradesh मध्ये पावसाचा हाहाकार, कडप्पा जिल्ह्यात पुरात प्रवाशांसह बस वाहून गेली
Continues below advertisement
तिरुपती आणि आंध्रपदेशमध्ये मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे हाहाःकार उडालाय. पावसामुळे पूर आलाय आणि या पुरात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय.. तुमच्या टीव्ही स्क्रीनवरची दृश्य आंध्रपदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातली आहेत. चित्रावची नदीच्या पुरात अकलेल्या 10 जणांना हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्यात आलंय.
पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरमधून नेतानाची थरारक दृश्य समोर आली आहेत. आंध्रपदेशच्या अनंतपुरम आणि कडप्पा जिल्ह्यातील नद्यांनी पात्र सोडलंय आणि त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना फटका बसलाय. या पुराच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याचीही शक्यता व्य़क्त केली जातेय. कडप्पा जिल्ह्यात एक बसही पुराच्या पाण्यात वाहून गेली.
Continues below advertisement