Lakhimpur Kheri violence: लखीमपूर खेरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आज महत्वाची सुनावणी
Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे टायटल Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हेही खंडपीठाचे सदस्य आहेत.
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक, अजय मिश्रा यांच्या मूळ गावी दंगलचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.