Hathras Case | आम्हाला धमकावलं जातंय; पीडितेच्या कुटुंबातील मुलाची माध्यमांना प्रतिक्रिया

Continues below advertisement
उत्तर प्रदेशमधील हथरसमध्ये पोलिसांकडून अजूनही दडपशाही सुरूच आहे. काही वेळापूर्वी पीडितेच्या कुटुंबातील एक मुलगा पोलिसांची नजर चुकवत बाहेर आला. त्यानं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना गाठलं आणि आम्हाला धमकावलं जातंय, आमचे फोन जप्त करण्यात आले आहेत, आम्हाला माध्यमांशीही बोलू दिलं जात नाही, आम्हाला बोलायचं आहे, असं या मुलानं सांगितलं. त्यानंतर तिथं आलेल्या पोलिसांनी त्याला हुसकावलं. तेव्हा तिथं आलेल्या एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींनी पोलिसांना प्रश्न विचारले. त्यावेळी पोलिसांनी वरचा आदेश असल्याचं सांगत, प्रसार माध्यमांना अजूनही गावाबाहेर रोखून ठेवलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram