Gujrat : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, बस थेट टोलबूथवर आदळली, 15 जखमी
बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एका अपघाताची, मात्र ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.. गुजरातच्या सोनगडमधील एका टोलनाक्यावर खासगी बसनं जोरदार धडक दिली. काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य टोलनाक्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा टोलनाक्यावरच्या कक्षात एक महिला कर्मचारी होती. सुदैवानं अद्याप या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही... मात्र १५ जण गंभीर जखमी झाले आहेत...