GPS Toll : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून जीपीएस टोलवसुलीचा मुहूर्त जाहीर
Continues below advertisement
GPS Toll : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून जीपीएस टोलवसुलीचा मुहूर्त जाहीर आगामी आर्थिक वर्षात म्हणजे पुढील वर्षी मार्च एप्रिल महिन्यात जीपीएस तंत्रज्ञानावर आधारीत टोल आकारणी व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर सध्या वसुली करत असलेल्या टोलनाक्यांऐवजी नवीन तंत्रज्ञानावर आधारीत जीपीएस सुसज्जीत नवी टोल आकारणी व्यवस्था सुरु करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यापूर्वी अनेकदा यासंदर्भातल्या घोषणा केल्या असल्या तरी, आता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग टोलनाकेमुक्त करण्यासाठी निश्चित वेळ जाहीर केली आहे. काल बुधवारी त्यांनी ही घोषणा केली.
Continues below advertisement