India : कोविड काळात सरकारकडून गरीबांना दिलं जाणारं मोफत धान्य होणार बंद ?
Continues below advertisement
कोविड काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून गरीबांना दिलं जाणारं मोफत धान्य नोव्हेंबरनंतर बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेतून नोव्हेंबरनंतर गरीबांना मोफत रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर गरीबांना मोफत रेशन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2020 मध्ये केली होती. यावर्षी जूनमध्ये ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. आता नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळण्याची शक्यता कमी आहे.
Continues below advertisement