
EWS : उत्पन्न मर्यादेत बदल होण्याची शक्यता, नवी मर्यादा 4 आठवड्यात कळवणार
Continues below advertisement
आर्थिक दृष्ट्या दुर्बल आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार असल्याचं कळतंय. सध्या ही मर्यादा ईडब्ल्यूएस गटासाठी वार्षिक आठ लाख रुपये इतकी आहे. पुढच्या चार आठवड्यात याबाबतची नवी मर्यादा केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला कळवणार असल्याची माहिती मिळतेय. जोपर्यंत ही EWS ची नवी मर्यादा ठरत नाही तोपर्यंत मेडिकल प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलीय.
Continues below advertisement