RIL AGM 2020 | गुगलचा जिओमध्ये 33 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या सहभागाविषयीही माहिती दिली. जिओ प्लॅटफॉर्मवर गुगल 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.