Taliban and Indian Wheat: भारतानं पाठवलेला गहू चांगला- तालिबान ABP Majha

Continues below advertisement

आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तानवर सध्या तालिबान नाराज आहे. त्याचं कारण आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये पाठवलेला गहू. पाकिस्ताननं पाठवलेला हा गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगत तालिबाननं नाराजी व्यक्त केलीय. तालिबानच्या अधिकाऱ्यांनीच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिलीय. भारतानं पाठवलेला २ हजार मेट्रिक टन गहू मात्र चांगल्या दर्जाचा आहे, असं कौतुकही तालिबाननं केलंय. सध्या तालिबान संकटात आहे. आणि भारताकडूनही त्यांना सातत्यानं मदत पाठवली जातेय. दुसरीकडे पाकिस्तानमधून केलेल्या मदतीवर मात्र तालिबान नाराज आहे. निकृष्ट गहू पाठवल्याबद्दल तालिबाननं व्यक्त केलेली नाराजी अशा वेळी आहे, जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर गव्हाचा करार करून परतलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram