Gold Demand : सोन्याचे दर गगनाला भिडले असताना सुध्दा भारतात सोन्याच्या मागणीत 47 टक्क्यांनी वाढ
Continues below advertisement
गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत वार्षिक 47टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या दिवाळीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनं स्वस्त होईल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र सोन्याच्या दरात होणारी वाढ ही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. गेल्यावर्षी जुलै-सप्टेंबर महिन्यात देशातील सोन्याची मागणी 94.6 टन इतकी होती. मात्र, यंदा हीच मागणी 139.1 टनांवर गेली आहे.
Continues below advertisement